भाजी विक्रेत्या महिलेचा विनयभंग

0
345

भोसरी, दि. ४ (पीसीबी) – भाजी विक्रेत्या महिलेसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. हा प्रकार ऑगस्ट २०२२ ते ३ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत दापोडी येथे घडला.

राजू काची, किरण काची आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे दापोडी येथे भाजी विक्रीचे दुकान आहे. त्यांच्या दुकानासमोरून जात असताना आरोपी वारंवार जोरजोरात अश्लील शेरेबाजी करत. त्यांच्याकडे पाहून अश्लील हातवारे करत त्यांना धमकी देत. फिर्यादी यांनी आरोपींना याबाबत जाब विचारला असता आरोपींच्या महिला साथीदाराने फिर्यादीस शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.