डाटा एन्ट्री ऑपरेटरला अटक
निगडी, दि. ४ (पीसीबी) निगडी प्राधिकरण येथे एका डाटा एन्ट्री ऑपरेटरने तरुणीला जात प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी चार हजारांची लाच घेतली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लाऊन कारवाई करत डाटा एंट्री ऑपरेटर ला अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. २) दुपारी करण्यात आली.
शैलेश एकांबरी बासुतकर (वय ४१, रा. सांगवी) असे अटक केलेल्या डाटा एंट्री ऑपरेटरचे नाव आहे. याप्रकरणी २५ वर्षीय तरुणीने एसीबीकडे तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीच्या दोन लहान बहिणींचे जात प्रमाणपत्र काढायचे होते. त्यासाठी त्यांनी तहसील कार्यालयात अर्ज देखील केला होता. त्या अर्जावर कार्यवाही करून दोन्ही जात प्रमाणपत्रे मिळवून देण्यासाठी आरोपीने चार हजारांची लाख मागितली. दरम्यान तरुणीने एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने आरोपी बासुतकर याला याला चार हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. एसीबीचे पोलीस निरीक्षक संदीप वऱ्हाडे तपास करीत आहेत.