चिंचवडमधून अश्विनी जगताप, कसब्यात हेमंत रासणे

0
679

पुणे, दि. ४ (पीसीबी) – पुण्यातील कसबा तर पिंपरीतील चिंचवड विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीचे वातावरण मागील काही दिवसांपासून चांगलेच तापले आहे. आज या दोन्ही मतदारसंघासाठी भाजपाच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

यामध्ये कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. तसेच चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अश्वीनी जगताप यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे.

भाजप मधून आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप आणि पत्नी आश्विनी जगताप यांची नावे स्पर्धेच होती. भाजपने चाचपणी केली असता पत्नी म्हणून आश्विनी यांना मोठी सहानुभूती मिळेल असे लक्षात आले आणि त्यानंतर उमेदवारी निश्चित केली.