एकाच महिन्यात दहा टोळ्यांवर मोका

0
377

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड पोलिसांनी जानेवारी महिन्यात हद्दीतील दहा टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये (मोका) कारवाई केली. दहा टोळ्यातील तब्बल 110 जणांवर मोक्का अतंर्गत कारवाई करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत वाढलेल्या संघटीत गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील काही दिवसांपासून रोकॉर्डवरील गुन्हेगारांचे रेकॉर्ड अद्यावलत करत ही कारवाई कऱण्यात आली. यामध्ये मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे सात प्रस्ताव मांडण्यात आले ज्यामध्ये 110 जणांवर कारवाई करण्यात आली.

यामध्ये चिंचवड पोलीस ठाण्याअंतर्गत अनिल तुकाराम महिते व त्याचे इतर 10 साथीदार, हिंजवडी पोलीस ठाणेय अंतर्गत हिरा बहादुर हमाल इतर सात जण, चाकण पोलीस ठाणे अंतर्गत शुभम सुरेश म्हस्के व इतर 17 जण, निगडी पोलीस ठाणे अंतर्गत दत्ता बाबु संर्यवंशी व इतर तीन, चिंचवड पोलीस ठाण्याच्या दुसऱ्या कारवाईमध्ये आकाश राजू काळे व इतर 6 जण, पिंपरी पोलीस ठाणे अंतर्गत विशाल विष्णू लष्करे व इतर 30 जण तसेच तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे अंतर्गत कुणाल धिरज ठाकुर इतर 29 जण अशा 110 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. तर निगडी पोलीस ठाणे येथे अक्षय मुकंद गायकवाड याच्यावर एम.पी.डी.ए. अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.

मोका कारवाईतील टोळ्या –
अनिल तुकाराम मोहिते, व इतर १०
हिरा बहादुर हमाल व इतर ०७
शुभम सुरेश म्हस्के व इतर १७
दत्ता बाबु सुर्यवंशी व इतर ०३
आकाश राजू काळे व इतर ०६ –
विशाल विष्णू लष्करे व इतर ३०
कुणाल धिरज ठाकुर व इतर २९
अक्षय मुकुंद गायकवाड एमपीडीए अंतर्गत स्थानबध्द करण्यात आले.