उघड्या दरवाजावाटे साडेचार लाखांचे दागिने चोरीला

0
199

हिंजवडी, दि. ३ (पीसीबी) – उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून चोरट्याने साडे चार लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या कालावधीत बावधन येथील पेटीएम सोसायटी येथे घडली.

याप्रकरणी 42 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरात उघड्या दरवाज्याद्वारे घरातील कपाटातील 4 लाख 65 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.