भाजपच्या प्रदेश प्रवक्तेपदी एकनाथ पवार यांची फेरनियुक्ती

0
295

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे माजी शहराध्यक्ष, महापालिकेचे माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांची भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश प्रवक्तेपदी फेरनियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा प्रदेश प्रवक्त्यांची यादी विस्तारित केली आहे.

भाजपाचा अभ्यासू आणि प्रभावी वक्ता अशी एकनाथ पवार यांची ओळख आहे. महापालिकेत सत्ता मिळाल्यानंतर पहिल्यांदाच भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांमधून पवार यांना सत्तारुढ पक्षनेतेपदी संधी देण्यात आली होती. राज्य आणि केंद्रातील दिग्गज नेत्यांच्या संपर्कात असलेले पवार भाजपाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ओळखले जातात.

11 मे 2022 रोजी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवार यांची प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती झाली होती. नवीन चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा प्रदेश प्रवक्त्यांची यादी विस्तारित केली आहे. जिल्हानिहाय प्रदेश प्रवक्ते नियुक्त केले आहेत. पिंपरीतून प्रदेश प्रवक्ते असलेले एकनाथ पवार यांची प्रवक्तेपदी फेरनियुक्ती करण्यात आली आहे.