कोकण विभागीय शिक्षक मतदारसंघात भाजपचा विजय

0
415

रायगड, दि. २ (पीसीबी) : शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा पहिला निकाल आला आहे. कोकण विभागीय शिक्षक मतदारसंघात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले आहेत. त्यांनी शेकापचे बाळाराम पाटील यांना पराभूत केलं आहे.

राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. नाशिक आणि अमरावती बाबत सर्वांनाच उत्कंठा लागून राहिली आहे. पहिलाच निकाल भाजपच्या बाजुने आल्याने सत्ताधारी मंडळी जोमात आहेत.