आता सात लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर इन्कम टॅक्स नाही

0
159

नवी दिल्ली, दि. १(पीसीबी) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मध्यमवर्गीयांसाठी मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, आता सात लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मध्यमवर्गीयांसाठी मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, आता सात लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही. यापूर्वी ही मर्यादा ५ लाख रुपये होती. त्याचबरोबर निर्मला सीतारामण यांनी नव्या टॅक्स लॅबमध्ये देखील मोठा दिलासा दिला आहे. या नव्या स्लॅबनुसार आता २.५० लाख रुपयांहून ७ लाख रुपये करण्यात आलं आहे.

नव्या कर रचनेनुसार आता ६ स्लॅब असणार आहेत. याची सुरुवात २.५ लाखांपासून सुरु होणार आहे. यापूर्वी या कर प्रणालीत ५ स्लॅब होते. यामध्ये आता तीन लाखांपर्यंतच्या उत्पन्नात कोणताही स्लॅब असणार नाही.
सीतारामण यांच्या घोषणेनुसार, वैयक्तिक टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार, ०-३ लाखांपर्यंत कोणताही स्लॅब असणार नाही. त्यानंतर ३-६ लाखांपर्यंत ५ टक्के तर ६-९ लाखांपर्यंत १० टक्के, ९-१२ लाखांपर्यंत १५ टक्के त्यानंतर १२-१५ लाखांसाठी २० टक्के आणि १५ लाखांच्यावर ३० टक्के अशी नवी कर रचना असणार आहे.