माध्यमिक विद्यालय थेरगावच्या कबड्डी संघास राज्य स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा विजेतेपद

0
474

पिंपरी दि. ३१ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक विद्यालय थेरगावच्या 14 वर्ष मुलींच्या कबड्डी संघाने महाराष्ट्र क्रीडा संचालनालय पुरस्कृत पुणे राज्यस्तरावर कबड्डी स्पर्धेत पिंपरी-चिंचवड शहराचे प्रतिनिधित्व करीत अंतिम सामन्यात विजयी संपादन करत 24 ते 25 जानेवारी दरम्यान जळगाव येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेत उपविजेते होण्याचा बहुमान मिळवला आहे.

कबड्डी क्षेत्रातील या उज्वल यशासाठी संघातील रूपाली राठोड, अंजली पौळ, डिंपल उडानशिवे, विद्या सालकमवाड, ऋतुजा चव्हाण, व्यंकाम्मा पवार, आयुष्या बारणे, भारती किरवे, कार्तिकी काकडे,लक्ष्मी माटुळकर, प्राजक्ता केदारी, मनीषा गायकवाड या खेळाडूंसह मार्गदर्शक श्टवे बन्सी व सोनाली जाधव यांचा अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी उपजिल्हाधिकारी बाळासाहेब खांडेकर, उप आयुक्त संदीप खोत, रविकिरण घोडके, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, क्रीडा अधिकारी अनिता केदारी, क्रीडा पर्यवेक्षक दीपक कन्हेरे, मुख्याध्यापक बाळासाहेब राठोड, प्रशासन अधिकारी परशुराम वाघमोडे उपस्थित होते.