केमिस्टहृदयसम्राट आप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जेष्ठ नागरिक संघाला उपयुक्त वस्तूंचे वाटप !

0
369

काळेवाडी, दि.२६ (पीसीबी) : केमिस्टहृदयसम्राट आप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त व भारताच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टच्या पिंपरी झोन तर्फे, जेष्ठ नागरिक संघ काळेवाडी येथे संघाला उपयुक्त अशा अनेक साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये अडल्ट डायपर, वॅाकींग स्टीक, ओआरएस, वॅाकर तसेच नाश्ता चे वाटप करण्यात आले.

यावेळी पिंपरी चिंचवडचे विरोधी पक्ष नेते विठ्ठल (नाना) काटे यांच्या हस्ते उपयुक्त वस्तूंचे वाटप करण्यात आले. नाना काटे यांनी आप्पासाहेबांना उदंड आयुष्य लाभो आणी आप्पांच्या अतुलनीय कामाचे कौतुक केले. असेच कार्य त्याच्या हातून घडत राहो अशा शुभेच्छा दिल्या.

दरम्यान या कार्यक्रमाला जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पद्माकर जांभळे, सुखदेव खेडकर, काटे मामा, संगीताताई कोकणे, नखाते ताई, म्हाळप्पा दुधभाते, प्रशांत कदम, परविंदरसिंग बाध, केतन थोरात, तेजस साळवी,सचिन दोरगे, गणेश पवार, आशिष परमार, रूषीकेश जुंडरे, संदीप सूर्यवंशी, संपत गुणावरे, उद्धव धुमाळे, स्वप्नील जंगम, किरण निकम,निलेश अमृतकर, अमोल शिनकर,विवेक तापकीर व बहुसंख्य केमिस्ट व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

सदर कार्यक्रमावेळी केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे विवेक तापकीर यांनी जेष्ठांसाठी अनेक विविध उपक्रम व आरोग्य शिबीराचे आयोजन करणार असल्याचे जाहीर केले. तसेच, या उपक्रमासाठी हरि ओम फार्मा, मोरया फार्मा चे मारूती हाके, सह्याद्री फार्मा चे संतोषजी बोडके यांनी विशेष सहकार्य केले

सर्व जेष्ठ नागरिकांनी केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टच्या (पिंपरी झोन) या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. तसेच आदरणीय आप्पासाहेब शिंदे यांना उदंड आयुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या. जेष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा अविस्मरणीय होता.