चंद्रकांत पाटील घेणार चिंचवड चा आढावा, बुधवारी बैठक

0
222

– संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांची माहिती

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील उद्या पिंपरी-चिंचवडमधील कोअर कमिटीची पूर्वतयारी आढावा बैठक घेणार आहेत, अशी माहिती भाजपा शहर संघटक अमोल थोरात यांनी दिली.

चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे दि. ३ जानेवारी २०२३ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी अवघ्या १५ दिवसांत अनपेक्षितपणे पोटनिवडणूक जाहीर झाली. दि. २७ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान, तर २ मार्चला मतमोजणी होणार आहे.

दरम्यान, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील उद्या, दि. २५ जानेवारी २०२३ रोजी पिंपरी-चिंचवड शहरात येणार आहेत. त्यावेळी शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, प्रदेश सरचिटणीस तथा पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत ‘कोअर कमिटी’तील पदाधिकाऱ्यांसोबत विविध मुद्यांवर चर्चा करणार आहेत. त्यानंतर दुपारी २ वाजता हॉटेल कलासागर येथे प्रसार