`पठाण` चा कहर, १,१७००० हून अधिक अँडवान्स बुकींग

0
201

मुंबई, दि. २४ (पीसीबी) : २५ जानेवारी रोजी पठाण हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यासाठी चित्रपटाचे अडवान्स बुकिंग सुरु आहे.’पठाण’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात शाहरुख खान आणि दीपिका पादूकोण महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातील बेशरम रंग हे गाणे प्रदर्शित होताच सोशल मीडियावर चर्चेत होते. त्यानंतर प्रेक्षकांमध्ये आता चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. आता या चित्रपटाचं अडवान्स बुकिंग जोरदार सुरु असल्याचे समोर आले आहे.

‘पठाण’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या १० दिवस आधीच मोठ्या प्रमाणात अँडवान्स बुकींग सुरू झाले आहे. आतापर्यंत पठाण चित्रपटाचे १,१७००० हून अधिक अँडवान्स बुकींग झाले आहे. २५ जानेवारी रोजी जवळपास १० हजार चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. आता शाहरुखच्या या चित्रपटाच्या तिकिटची किंमत ऐकून धक्काच बसला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार गुरूग्रामच्या एंबियस मॉलमध्ये पठाण चित्रपटाचे एक तिकिट २४०० रुपयांना विकण्यात आल्याचे समोर आले. तरी देखील चाहते तिकिट बूक करत आहेत. आता सर्वजण २५ जानेवारीची वाट पाहात आहेत.

विदेशात चित्रपटाचे लिमिटेड बुकिंग सुरु झाले आहे. बुकिंगचे आकडे पाहाता चित्रपटाची ओपनिंग जोरदार होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. शाहरुखचे विदेशात असंख्य चाहते आहेत. त्यामुळे पठाण चित्रपटाचे सध्या जोरदार बुकिंग सुरु आहे.

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा ‘पठाण’ हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जॉन इब्राहिम देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या अॅक्शन थ्रीलर चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे.