चिंचवड, मोशीत होणार धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्र

0
283

पिंपरी, दि.२४(पिसीबी ) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने केशवनगर, चिंचवड येथील जलतरण तलावासमोरील मैदान आणि सेक्‍टर क्रमांक 10, स्पाइन रस्ता, मोशी प्राधिकरण अशा दोन ठिकाणी धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्याला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सर्वसाधारण सभेची मंजुरी दिली आहे.

केशवनगर येथील प्रशिक्षण केंद्र पिंपरी-चिंचवड असोसिएशनला देण्यात आले आहे. असोसिएशनचे सचिव व प्रशिक्षक सोनल बुंदुले हे केंद्र चालविणार आहेत. तर, मोशी प्राधिकरण येथील केंद्र द्रोणा आर्चरी या क्‍लबला देण्यात आले. या क्‍लबचे सचिव प्रशांत शिंदे हे प्रशिक्षण देणार आहेत. त्या केंद्रावर क्‍लबचे सचिव प्रशांत शिंदे हे प्रशिक्षण देणार आहेत. हे केंद्र 10 वर्षे कराराने देण्यात येणार आहेत.

प्रशिक्षण केंद्र विकसित करून शहरातील पालिका व खासगी शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी-खेळाडूंना तेथे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण घेणाऱ्या एकूण खेळाडूंपैकी 40 टक्के खेळाडू हे महापालिका शाळेचे असणे बंधनकारक आहे. त्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. लवकरच या दोन्ही संस्थांसोबत करारनामा करून घेण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष प्रशिक्षण देणे सुरू करण्यात येणार आहे.