चिंचवड मधील काकडे पार्क मध्ये घर फोडले

0
191

चिंचवड, दि. १९ (पीसीबी) – चिंचवड मधील काकडे पार्क येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून ४२ हजार ३५० रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना ३१ डिसेंबर ते १६ जानेवारी या कालावधीत घडली.

याप्रकरणी ५१ वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ३१ डिसेंबर रोजी गावी गेल्या होत्या. दरम्यान त्यांचे घर कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. घरातून २७ हजार रुपयांची सोन्याची अंगठी, १५ हजार रुपये रोख रक्कम असा ४२ हजार ३५० रुपयांचा ऐवज चोरून नेला. फिर्यादी १६ जानेवारी रोजी गावाहून परत आल्या असता हा प्रकार उघडकीस आला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.