चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक लढविण्याबाबत परिस्थिती बघून निर्णय घेवू – अजित पवार

0
348

चिंचवड, दि. १४ (पीसीबी) – चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक निवडणूक लागली नसताना चर्चा करण्यात अर्थ नाही असे माझे स्वत:चे मत आहे. मुंबईतील पोटनिवडणुकीत वेगळे आणि  पंढरपुर, नांदेडच्या पोटनिवडणुकीत वेगळे चित्र पहायला मिळाले होते. त्यामुळे त्या-त्या वेळची परिस्थिती बघून चिंचवड निवडणूक लढविण्याबाबत आम्ही योग्य तो निर्णय घेवू, असे राष्ट्रवादीचे नेते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्ट केले. 

चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे नुकतेच निधन झाले. त्याजागी पोटनिवडणूक होणार असून पोटनिवडणुकीची चर्चा सुरु झाली आहे. जगताप यांच्या पत्नी अश्विनी की बंधू शंकर जगताप दोघापैंकी कोण निवडणूक लढेल, निवडणूक बिनविरोध होईल की राष्ट्रवादी निवडणूक लढवेल याची चर्चा सुरु झाली आहे.

असताना पवार म्हणाले, पुण्यातील कसबा आणि  चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक निवडणूक आयोग लावेल. त्यामुळे निवडणूक लढविण्याबाबत अद्याप महाविकास आघाडीची भूमिका ठरली नाही. 2019 च्या निवडणुकीत चिंचवडची जागा आम्ही पुरस्कृत केली होती. कसब्याची जागा काँग्रेसने लढविली होती. त्यानंतरच्या काळात ब-याच प्रकारची राजकीय स्थियंत्तरे झाली असल्यामुळे त्यासंदर्भात शेवटी आम्ही सर्व सहका-यांशी चर्चा करु आणि त्याबाबतचा अंतिम निर्णय घेवू. आताच लगेच, निवडणूक लागली नसताना चर्चा करण्यात अर्थ नाही असे माझे स्वत:चे मत आहे. मुंबईतील पोटनिवडणुकीत वेगळे आणि  पंढरपुर, नांदेडच्या पोटनिवडणुकीत वेगळे चित्र पहायला मिळाले होते. त्यामुळे त्या-त्या वेळची परिस्थिती बघून निवडणूक लढविण्याबाबत आम्ही योग्य तो निर्णय घेवू, असे पवार यांनी स्पष्ट केले.