पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – मुलगी झाल्याच्या कारणावरून सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. ही घटना सन २०१५ ते ११ जानेवारी २०२३ या कालावधीत नेहरूनगर पिंपरी येथे घडली.
कृष्णा राजेंद्र चटोले (वय ३५), राजेंद्र चटोले (वय ६९), दोन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीस मुलगी झाली. तेंव्हापासून आरोपींनी मुलगी झाल्याच्या कारणावरून विवाहितेला किरकोळ कारणावरून त्रास देऊन छळ केला. माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत शिवीगाळ करून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.