पिंपरी चिंचवड रा.स्व.संघाचा रविवारी मकरसंक्रांत उत्सव

0
278

भव्य शारीरिक प्रात्यक्षिक कार्यक्रम

चिंचवड, दि. १३ (पीसीबी) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पिंपरी चिंचवड शहरातर्फे सांगवी येथील पी. डब्लू. डी.मैदानावर रविवार दि.१५ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता भव्य मकर संक्रांत उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

संघ स्वयंसेवकांचे निष्कलंक चारित्र्य, जाज्वल्य देशभक्ती,प्रामाणिकता, समाजाभिमुख कार्यात प्रचंड मोठा सहभाग या वैशिष्ट्यांसह संघ गेल्या ९८ वर्षांपासून हिंदू समाजातील समस्त घटकांना संघटित करण्यासाठी कार्यरत असून या देशव्यापी विशाल संघटनेचे पिंपरी चिंचवड मधील संघटनात्मक कार्याचे स्वरूप दाखविण्यासाठी यावर्षीचा मकर संक्रांत उत्सव जाहीर स्वरूपात आयोजित केला आहे. भारतीय नौसेनेचे सेवानिवृत्त लेफ्टनंट कमांडर भानुदासजी जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून प्रमुख वक्ते रा.स्व.संघाचे अखिल भारतीय शारीरिक शिक्षण प्रमुख सुनिलजी कुलकर्णी उपस्थितांना संबोधित करतील. कार्यक्रमात व्यायाम योग, नियुध्द (कराटे), दंड, यष्टी,सामूहिक समता, घोष (बँड) प्रात्यक्षिके सादर होणार असून या भव्य कार्यक्रमाला शहरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड जिल्हा संघचालक विनोदजी बन्सल यांनी केले आहे.