ओएलएक्स वरून गाडी खरेदीच्या बहाण्याने साडे चार लाखांची फसवणूक

0
243

सांगवी, दि. ८ (पीसीबी) – ओएलएक्स वरून गाडी खरेदी करत असताना एकाची तब्बल साडे चार लाखांची फसवणूक झाली आहे. हा प्रकार जुनी सांगवी येथे 19 मे 2022 ते 30 मे 2022 या कालावधीत घडला आहे.

याप्रकरणी रविवारी (दि.8) कुणाल वसंत बऱ्हाटे (वय 32 रा.नवी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सनी सुनिल दाते (रा. सुसगाव, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपीने ओलएकवरून मारुती ब्रिझा (एमएच 12 पी.एच.5554) गाडी विकायची आहे अशी जाहिरात केली. त्यानुसार फिर्यादी यांनी गाडीचा फोटो पाहून आरोपी शी संपर्क साधला त्यानुसार 6 लाख 70 हजार रुपयांमध्ये व्यवहार ठरला.त्यानुसार फिर्यादी यांनी 4 लाख 50 हजार रुपये आरोपीला पाठवले देखील, उर्वरीत 2 लाख 20 हजार रुपये देणार असतानाही आरोपीने गाडी न देता त्यांची फसवणूक केली. यावरून सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.