स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट

0
345

पुणे, दि. ८ (पीसीबी) : गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कोंढवा भागातील लुल्लानगर येथील लाना स्पर्श स्पावर छापा टाकून सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे. यावेळी पोलिसांकडून चार तरुणींची सुटका करण्यात आली आहे.

लुल्लानगर येथील गुलमोहर बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर फ्लॅट क्रमांक ६ मध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून कोंढव्यातील स्पर्श स्पा येथे छापा टाकला. त्यावेळी तेथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याचं आढळून आलं. यावेळी पोलिसांनी तीन परदेशी व एका भारतीय महिलेची सुटका केली.

या प्रकरणी तिघांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लालरामन लाल्तफळा ( रा. कोंढवा ) संदीप मोकाशी ( रा. कोंढवा ) आणि अमोल राऊत ( रा. कोंढवा ) यांच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.