शरद पवार यांची स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या घरी भेट

0
318

>> जगताप कुटुंबाचं केलं सांत्वन

चिंचवड, दि. ०७ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड विधानसभेचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. ०६) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सायंकाळी लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

लक्ष्मण याची सार्वजनिक जीवनाची सुरुवात माझ्यामुळ झाली. काँग्रेस पक्षात मी काम करत होतो. मी महानगर पालिकेच्या निवडणुकीत लक्ष्मण आणि इतर सहकार्यांना उभं केलं. सहा – सात जण निवडून आले पैकी लक्ष्मण होता. नंतर, सार्वजनिक जीवनात संपर्क वाढवून त्यांचं स्थान मजबूत केलं. लोकांचा पाठिंबा अखंडपणे राहिला. महापौर पदाची जबाबदारी, विधानसभेची संधी त्याला मिळाली. दुर्दैवाने त्यांना कॅन्सर झाला. मला ही तो झाला होता. त्या रोगाशी लढाई करायची असते. त्या रोगाशी लढावं लागतं. मी त्यांना सांगितलं लक्ष्मण या रोगासोबत लढावं लागतं. त्यांनीही सांगितलं सायकलिंग करतोय, व्यायाम करतो आहे. पण सगळ्या काही गोष्टी आपल्या हातात नाहीत. दुर्दैवाने हा प्रसंग आला आहे, अशी भावना शरद पवारांनी यावेळी व्यक्त केली.