श्रमिक पत्रकार संघातर्फे जेष्ठ पत्रकारांचा सत्कार

0
320

पिंपरी दि. ६ (पीसीबी) – पत्रकार दिनानिमित्त पिंपरी चिंचवड श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष सुनील लांडगे यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकारांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करण्यात आला. लोकमतचे संपादक संजय आवटे यांनी लिहिलले `आम्ही भारताचे लोक` हे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक, शाल, पुष्प देऊन जेष्ठ पत्रकारांना सन्मानित करण्यात आले.

सत्कारार्थींमध्ये ज्येष्ठ पत्रकार व ‘पुरोगामी महाराष्ट्र ‘चे संपादक नंदकुमार सातुर्डेकर, दै. सकाळचे पूर्वाश्रमिचे राजकीय संपादक गोविंद घोळवे, पीसीबी टुडे चे संपादक अविनाश चिलेकर, दै. केसरीचे सहयोगी संपादक विजय भोसले, दै. महाराष्ट्र हेरॉल्डचे निवृत्त वार्ताहर माधव सहस्रबुद्धे, दै. विश्व सह्यद्रीचे संपादक मिलिंद वैद्य, दै. सकाळचे निवृत्त सहयोगी संपादक राजन वडके आदींचा समावेश होता. पत्रकारांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करण्यात आला.

शहरातील सर्व राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कामगार तसेच औद्योगिक घडामोडींचे चालते बोलते विद्यापीठ म्हणून सर्व जेष्ठ पत्रकारांचे खूप मोठे योगदाना आहे. मुंबई- पुणे शहराच्या बरोबरीचे पिंपरी चिंचवड शहर व्हावे यासाठी राज्यकर्ते जितके प्रयास करतात तितकेच अखंड कार्य या पत्रकारांचे आहे. बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनी पत्रकार दिन म्हणून या सर्वांची जाणीव म्हणून हा सन्मान उपक्रम हाती घेतल्याचा संघटनेचे अध्यक्ष सुनिल लांडगे यांनी सांगितले.