अभिनेते अशोक सराफ यांच्या कारकीर्दीची ५० वर्षे पूर्ण होत आहेत… यानिमित्ताने ‘अशोक पर्व’ या कार्यक्रमाचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उदघाटन

0
195

पुणे, ५ : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या नाट्य – चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला यंदा ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने त्यांचा अभिनय क्षेत्रातील सुवर्ण महोत्सवी प्रवास उलगडणाऱ्या अशोक पर्व या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ४ जानेवारी रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात या कार्यक्रमाचे उदघाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते तिसरी घंटा देण्यात आली. यावेळी अशोक सराफ यांचा सत्कार करत त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल सन्मानही करण्यात आला.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटले कि, मराठी चित्रपट सृष्टीतील अनभिषिक्त सम्राट अशोक सराफ म्हणजेच आपले सर्वांचे लाडके अशोक मामा हे आपल्या कारकीर्दीची ५० वर्षे पूर्ण करत आहेत. त्यानिमित्त प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक रावेतकर ग्रुपच्या माध्यमातून अशोकमामांच्या कारकिर्दीला अभिवादन करण्यासाठी तीन दिवस ‘अशोक पर्व’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, त्याचे उद्घाटन आज माझ्या हस्ते तिसरी घंटा देऊन झाले. यानिमित्ताने अशोक मामांचा सत्कार करत त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल सन्मानही केला, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

अशोक पर्व या विशेष कार्यक्रमाचे आयोजन हे ४, ७ आणि ८ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सराफ यांची भूमिका असलेले नाटक, चित्रपट आणि प्रकट मुलखात रसिकांना अनुभवता येणार आहे. : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या नाट्य – चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला यंदा ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने त्यांचा अभिनय क्षेत्रातील सुवर्ण महोत्सवी प्रवास उलगडणाऱ्या अशोक पर्व या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ४ जानेवारी रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात या कार्यक्रमाचे उदघाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते तिसरी घंटा देण्यात आली. यावेळी अशोक सराफ यांचा सत्कार करत त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल सन्मानही करण्यात आला.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटले कि, मराठी चित्रपट सृष्टीतील अनभिषिक्त सम्राट अशोक सराफ म्हणजेच आपले सर्वांचे लाडके अशोक मामा हे आपल्या कारकीर्दीची ५० वर्षे पूर्ण करत आहेत. त्यानिमित्त प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक रावेतकर ग्रुपच्या माध्यमातून अशोकमामांच्या कारकिर्दीला अभिवादन करण्यासाठी तीन दिवस ‘अशोक पर्व’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, त्याचे उद्घाटन आज माझ्या हस्ते तिसरी घंटा देऊन झाले. यानिमित्ताने अशोक मामांचा सत्कार करत त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल सन्मानही केला, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

अशोक पर्व या विशेष कार्यक्रमाचे आयोजन हे ४, ७ आणि ८ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सराफ यांची भूमिका असलेले नाटक, चित्रपट आणि प्रकट मुलखात रसिकांना अनुभवता येणार आहे.