विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वाहिली आमदार लक्ष्मण जगताप श्रद्धांजली

0
382

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – विधानसभेचे विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवाeर यांनी आज (गुरुवारी) चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटूंबियांचे सांत्वन केले. जगताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक आप्पा रेणुसे आदी यावेळी उपस्थित होते.

आमदार लक्ष्मण जगताप यांचे मंगळवारी (दि.3) प्रदीर्घ आजाराने निधन झाले. कर्करोगाशी सुरू असलेली झुंज त्यांची अपयशी ठरली. पिंपरी-चिंचवड शहर दौऱ्यावर आलेले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पिंपळेगुरव येथील जगताप यांच्या निवासस्थानी जाऊन कुटूंबियांचे सांत्वन केले.