दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना महापालिकेच्या वतीने श्रद्धांजली

0
287

पिंपरी, दि. 4 (पीसीबी) – दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना आज महापालिकेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आमदार जगताप यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी माजी नगरसेवक राजू बनसोडे, उपआयुक्त रविकिरण घोडके, सहायक आयुक्त श्रीनिवास दांगट, विशेष अधिकारी किरण गायकवाड, सहशहर अभियंता आबासाहेब गलबले, कार्यकारी अभियंता दिलीप धुमाळ, प्रशासन अधिकारी मुकेश कोळप, कर्मचारी महासंघाचे मनोज माछरे, दिगंबर चिंचवडे, नितीन समगीर यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये नगरसेवक, स्थायी समितीचे सभापती तसेच महापौरपदही भूषवले. शिवाय ते विधान परिषदेचे सदस्यही राहिले आहेत. सध्या ते चिंचवड विधानसभेचे विद्यमान सदस्य होते. त्यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आज श्रद्धांजली वाहण्यात आली.