अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात !

0
387

पुणे , दि. 4 (पीसीबी)-मराठी मनोरंजन विश्वामध्ये नेहमीच आपल्या परखड, आक्रमक स्वभावामुळे आणि वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणारी अभिनेत्री केतकी चितळे ही नेहमीच तिच्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडते. २०२२ मध्ये केतकीच्या वादग्रस्त पोस्टमुळे तिला जेलमध्ये जावे लागले होते. त्यानंतर संपूर्ण वर्षभर केतकी प्रचंड चर्चेत होती.केतकीला काही महिन्याआधीच तिच्या फेसबुकचे अक्सेस परत देण्यात आले. त्यानंतर केतकी सोशल मीडियावर प्रामुख्याने फेसबुकवर सक्रीय झाली. केतकीच्या सोशल मीडिया पोस्ट पुन्हा चर्चेत येऊ लागल्या.

केतकीनं फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केलाय ज्यात तिच्या हातात दारूचा ग्लास दिसत आहे. ग्लास हातात घेऊन केतकी सर्वांना नवीन वर्षांच्या शुभेच्छा देताना दिसतेय. हा व्हिडीओ शेअर करत केतकीनं एक पोस्ट लिहिली आहे.ज्यात तिने म्हटलय, ‘फादर त्या सगळ्यांना माफ करा. कारण त्यांना माहिती नाहीये ते काय करत आहेत. ती काही चुकीचे बोलत असेन तर मला नक्की सांगा. मैं कट्टर सनातन हिन्दू हूँ लेकीन इसका मतलब यह नहीं की बाकी सब १०० % गलत है. सगळ्यांना माफ करा पण कधी विसरू नका’

केतकीचा दारू पितानाचा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच संतापले. केतकीला पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. एका युझरनं म्हटलं, ‘वाह दीदी… लोकांना सांगायचं इंग्रजी परंपरा पाळू नका आणि आपण ढोसायचं’. या युझरला उत्तर देत केतकीनं वादग्रस्त्र विधान केलं आहे.तिने म्हटलय, ‘मी कधी म्हणाले इंग्रजी परंपरा पाळू नका? सोमरस म्हणजे वाईन. सनातन धर्मात दारू आहे. आमचे देवही दारू पितात. काली मातेला तर दारूचे नैवेद्य असते. तसंच काही शंकाराच्या मंदिरातही. स्वत:ची संस्कृती शिका, हे मी नेहमी लिहिते आणि सांगते. फरक शिका’.

केतकीने नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. कोरेगाव-भीमा येथील ऐतिहासिक लढाईची आठवण म्हणून साजरा करण्यात येणाऱ्या शौर्यदिनाच्या निमित्ताने तिने कोरेगाव भीमा येथे शौर्य दिनाबद्दल काहीही पोस्ट न टाकल्यामूळे तिच्यावर टिका करण्यात आली आहे.तिच्या व्हिडिओला एका नेटकऱ्यानं कमेंट करत लिहिलं होतं की ,“तमाम भारतीयांना भिमा कोरेगाव शौर्य दिनी शुभेच्छा द्याल असे वाटले होते. तुमच्याकडून आजचा दिवस दुर्लक्षित होणे अनपेक्षित आहे”या कमेंटवर केतकी भडकली आणि तिने त्या कमेंटवर खोचक प्रतिक्रिया दिली.

केतकी कमेंट करत म्हणाली, “भिमा कोरेगाव म्हणजे तीच जागा जिथे ब्रिटिश सैन्यातील तुकडी पेशव्यांच्या विरोधात लढली?! ब्रिटिश सरकारच्या बाजूने मराठा सैन्याविरुद्ध लढणाऱ्या लोकांना मी शुभेच्छा देण्याची तुम्ही अपेक्षा ठेवता म्हणजे एक तर तुम्हाला मी राष्ट्रद्रोही (धर्मद्रोही) वाटते, किंवा तुम्हाला खरा इतिहास माहिती नाही. यातील नेमके काय?” केतकीच्या या प्रतिक्रियेमुळे तिच्यावर पुन्हा टिका होत आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याने केतकी चितळे ४१ दिवस तुरुंगात होती. तिची ती पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिच्या विरोधात अनेक कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.अटक झाल्यानंतरही ती तिच्या भूमिकेवर ठाम होती. तिने तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दिलेल्या मुलाखतींमध्येही तिच्यासह घडलेला प्रकार बेयादेशीर होता असे म्हटले आहे. तरी अद्याप हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तुरुंगातून बाहेर आल्यावर केतकीने पोस्ट डिलिट करण्यास नकार दिला होता. आणि आजही तिच्या फेसबुक अकाऊंटवर ती पोस्ट पाहायला मिळतेय.