मोलकरणीने चोरली दोन लाखाची अंगठी

0
276

चिंचवड, दि. 04 (पीसीबी) – घरात काम करणाऱ्या मोलकरणीने बेडरूम मधून दोन लाख नऊ हजार २८ रुपये किमतीची अंगठी चोरली. त्यातील डायमंड काढून अंगठीचे नुकसान केले. ही घटना ३१ डिसेंबर रोजी सकाळी रहाटणी येथे घडली.

याप्रकरणी ३६ वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोलकरीण महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरात काम करणाऱ्या महिलेने ३१ डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास घरातील स्वच्छता करण्याच्या बहाण्याने बेडरूम मधून दोन लाख नऊ हजार २८ रुपये किमतीची अंगठी चोरली. त्यानंतर अंगठी मधील डायमंड करून अंगठीचे नुकसान करून अंगठी २ जानेवारी रोजी फिर्यादी यांच्या सोसायटीच्या गेटच्या आत फेकून दिली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.