हिंजवडी, चिखली येथे विनयभंगाच्या दोन घटना

0
226

हिंजवडी, दि. २ (पीसीबी) – हिंजवडी आणि चिखली परिसरात विनयभंगाच्या दोन घटना घडल्या. याप्रकरणी रविवारी (दि. १) गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

चिखली पोलीस ठाण्यात २६ वर्षीय महिलेने फिर्याद दिली. जलालुद्दीन रोजन खान (वय ४५, रा. कुदळवाडी, चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी खान याने फिर्यादीचे घर उघडून त्यांच्या घरात प्रवेश केला. फिर्यादींसोबत त्याने गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. फिर्यादीने त्यास विरोध केला असता त्याने फिर्यादीस मारहाण व शिवीगाळ केली. फिर्यादीने आरडा ओरडा केला असता त्यांचे कुटुंबीय आले असता आरोपीने धमकी देऊन घरातून पळ काढला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

हिंजवडी पोलीस ठाण्यात २४ वर्षीय महिलेने फिर्याद दिली. त्यानुसार श्रीनिवास रेड्डी, व्यंकटेश रेड्डी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणी ३१ डिसेंबर रोजी तिच्या रुममध्ये बसली असताना आरोपी रुममध्ये आले व त्यांनी पीडितेशी गैरवर्तन केले. त्य़ामुळे पीडितेच्या मनास लज्जा उत्पन्न झाली. याचा जाब विचारण्यासाठी पीडितेचा मित्र गेला असता त्यालाही शिवीगाळ करत मारहाण केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.