कामगारांचा पीएफ जमा न करता रकमेचा अपहार

0
233

भोसरी, दि. 2 (पीसीबी) – कामगारांचा भविष्य निर्वाह निधी (पीएफ) कापून घेत ती रक्कम पीएफ कार्यालयात जमा न करता पैशांचा अपहार केला. याप्रकरणी कंपनी मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जानेवारी ते मार्च २०१९ आणि ऑगस्ट २०२१ ते जानेवारी २०२२ या कालावधीत एमआयडीसी भोसरी येथे घडला.

नितीन शंकर जितुरी (रा. पर्वती, पुणे) आणि मकरंद राजगुरू (वय ५०, रा. कोथरूड, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सुजन रविचंद्रन मुदलीयार (वय ५३, रा. कोंढवा, पुणे) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फोकस रोबोटोमेशन प्रा ली या कंपनीचे मालक आरोपींनी कामगार योगेश खैरे यांचा जानेवारी ते मार्च २०१९ या कालावधीतील चार हजार ८०० रुपये आणि कामगार प्रसाद कामनदार यांचा ऑगस्ट २०२१ ते जानेवारी २०२२ या कालावधीतील १० हजार ८०० रुपये पगारातून पीएफसाठी कमी केले. ते पैसे पीएफ कार्यालयात जमा न करता पैशांचा अपहार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.