नागपूर, दि. २७ (पीसीबी) – विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार सभागृहात बोलत आहेत. यावेळी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरुन कौतुक केलं.
अजित पवार म्हणाले की, कुणी कितीही गप्पा मारु द्या देवेंद्र फडणवीस ताकदवान नेते आहेत. राज्यातले सध्याचे ताकदवान नेते हे देवेंद्र फडणवीस आहेत, अशा शब्दांत अजित पवारांनी फडणवीसांवर स्तुतीसुमनं उधळले आहेत.
अजित पवार पुढे म्हणाले की, बारामतीमध्ये घड्याळीचा करेक्ट कार्यक्रम करु, असं भाजपचे नेते म्हणाले होते. परंतु आमचं तिथं काम आहे. मी ठरवलं तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करु शकतो. मी कसा आहे महाराष्ट्राला चांगलं माहिती आहे.
देवेंद्रजीं म्हणतात, तसं मी कुणाच्या बापाचं ऐकत नाही, असंही अजित पवार बोलतांना म्हणाले.