धर्म बदलवण्यासाठी शीजान खानचा तनुषावर दबाव होता का ?

0
262

मुंबई,दि.२६(पीसीबी) – टी.व्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्ये प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेला शीजान खान आपल्या आणि तुनिषातील नात्यावर खुलासा करत आहे. शीजाननं चौकशीत सांगितलं आहे की, त्याचे आणि तुनिषाचे ब्रेकअप झाले होते. त्यानं ब्रेकअपचं कारण त्यांच्या वयातील अंतर आणि वेगळे धर्म असं सांगितलं आहे. शीजान खाननं सांगितलं आहे की तुनिषानं काही दिवस आधी देखील आत्महत्येचा प्रयत्न केला होता. धर्म बदण्यासाठी तनुषावर शीजान खान याचा दबाव होता का, या दिशेने आता पोलीस तपास करत आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शीजान खानने पोलिसांच्या चौकशी दरम्यान सांगितलं आहे की तुनिषानं तिच्या मृत्यूच्या काही दिवस आधी देखील आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पण त्यावेळी शीजाननं तुनिषाला तसं करण्यापासून थांबवलं होतं. या संदर्भात त्यानं तुनिषाच्या आईला देखील सांगितलं होतं असं तो म्हणाला. त्यांनी तुनिषाकडे लक्ष ठेवावं असं देखील त्यानं अभिनेत्रीच्या आईला सूचित केलं होतं. पोलिस शीजान खानच्या बोलण्यात किती खरेपणा आहे याची फेरतपासणी करीत आहेत. पोलिस हे जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत की तुनिषानं खरचं याआधी देखील आत्महत्येचा प्रयत्न केला होता का? तिच्या आत्महत्येमागे ब्रेकअप हेच कारण होतं की आणखी कुठलं या दिशेने देखील तपास सुरू आहे.