सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उद्या होणार जनसंवाद सभा

0
278

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने  सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उद्या सोमवारी सकाळी १० ते १२ यावेळेत जनसंवाद सभा होणार आहे.

नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये तसेच होणा-या विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय महिन्यातील दुस-या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येत आहे.

या सभेकरीता महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय मुख्य समन्वय अधिका-यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. ते या जनसंवाद सभेचे अध्यक्षस्थान भूषवत आहेत.