…म्हणून पिंपरी चिंचवडला तीन वर्ष्यापासून मनुस्मृतीचे होते दहन

0
406

पिंपरी, दि. 25 (पीसीबी) – महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दि २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड याठिकाणी विषमतावादी मनुस्मृतीचे सार्वजनिक दहन केले होते. या प्रसंगाचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या भिमसृष्टी मध्ये समावेश न केल्याने मागील ३ वर्षांपासून याकामी मनपाकडे पाठपुरावा सुरु असून मनपा जोपर्यंत या मनुस्मृती दहन प्रसंग भिमसृष्टी म्युरल्स मध्ये समाविष्ट करणार नाही तोपर्यंत दरवर्षी दि. २५ डिसेंबर रोजी मनुस्मृती दहन करून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

त्यानुसार आज रविवार (दि. 25) रोजी शहरातील पुरोगामी संघटनांच्या वतीने सकाळी 11 वाजता पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर मनुस्मृतीच्या प्रतिमेचे प्राथमिक दहन करण्यात आले स्वराज अभियान चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मानव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामध्ये बोलताना म्हणाले की “सातत्याने पाठपुरावा करूनही चार वर्षात महानगरपालिकेच्या प्रशासनाने मनुस्मृती दहनाचे समूह शिल्प भीमसृष्टीमध्ये समाविष्ट केलेले नाही, याचा आम्ही निषेध करत आहोत. त्याचबरोबर आगामी 14 एप्रिल पर्यंत जर हे समूह शिल्प समाविष्ट केले नाही तर सर्वसामाजिक संघटनांच्या वतीने हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल” या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक मारुती भापकर, इंदिरा काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष डॉक्टर कैलास कदम, मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, ऍड. लक्ष्मण रानवडे, संभाजी ब्रिगेडचे सतिश काळे, प्रवीण कदम, छावा संघटनेचे धनाजी येळकर पाटील, एम आय एम चे धम्मराज साळवे, नागरी हक्क सुरक्षा समितीचे प्रदीप पवार, गिरीश वाघमारे, दिलीप काकडे, संजय गायकवाड, आकाश शिंदे बारा बलुतेदार संघटनेचे विशाल जाधव, आरपीआय आठवले गटाचे बाळासाहेब रोकडे, भारतीय बौद्ध महासभेचे बापू गायकवाड, काँग्रेसचे नरेंद्र बनसोडे, डॉ. मनीषा गरुड अभिमन्यू दहीतुले व सर्व पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.