आय ए एस च्या 75 सायकलपटुंची पुणे टू हम्पी सहाशे किमी हेरिटेज राईड यशस्वीपणे संपन्न.

0
242

पुणे, दि. १३ (पीसीबी) – आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रामध्ये भारतामध्ये उल्लेखनीय काम करणारी इंडो ऍथलेटिक्स सोसायटी या संस्थेने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाच्या सुरुवातीनिमित्त 75 सायकल स्वरांनी मागील वर्षी पुणे ते कन्याकुमारी असे सोळाशे किलोमीटरचे अंतर यशस्वीपणे पार केले होते आणि यावर्षी पुणे ते हम्पी असे सहाशे किलोमीटरचे अंतर पार करून ते अमृत महोत्सवी वर्षाची सांगता केली . यासाठी पुन्हा एकदा आयएएस चे 75 सायकल स्वर पुणे ते हम्पीच्या दिवशी सायकलवर रवाना झाले होते. बुधवारी दिनांक 7 डिसेंबर रोजी पहाटे चार वाजता उद्योजक श्री. अण्णा बिरादार ,एफ डी सी लिमिटेड चे संदीप कुलकर्णी , महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता श्री. नितीन वानखेडे सर, प्रकाश शेटबाळे , इंडो अथलेटिक्स सोसायटीचे अजित पाटील, गणेश भुजबळ , गजानन खैरे व अमृता पाटील यांच्यातर्फे झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.

पुणे टू हम्पी हे अंतर तीन दिवसात पार करण्यात केले. प्रवासाचा मार्ग खालील प्रमाणे राहणार होता
पुणे ते मोहोळ – 240 किमी
मोहोळ ते विजापूर – 150 किमी
विजापूर ते हम्पी – 220 किमी
विजापूर येथील गोल घुमट व इब्राहिम रोजा या दोन ठिकाणी भेट देण्यात आली. तीन दिवस हम्पी मध्ये मुक्काम असल्यामुळे विविध ठिकाणांना भेट देण्यात आली. संपूर्ण हम्पी परिसरामध्ये असलेल्या ऐतिहासिक वारसा बद्दल माहिती घेण्यात आली. राईड मध्ये पुणे ,पिंपरी चिंचवड, मावळ तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातून सायकल प्रेमींनी सहभाग घेतला होता. सर्व रायडर्स सहाशे किलोमीटर पेक्षा जास्त अंतर सायकलिंग केली.प्रवासादरम्यान भिगवन येथे भिगवन साईकलिस्ट क्लब यांनी सरबत व अल्पोपहार याची सोय केली होती, सोलापूर येथे माऊली राजे मंगल कार्यालय येथे एमआयडीसी सोलापूर वरिष्ठ अभियंता अशोक मगर सर यांनी सर्व सोय केली होती, टेंभुर्णी येथे स्वप्निल लोढा यांचे साडू श्री.संचेती, वैभव गायकवाड, मारुती गाडेकर सर, मनोज चोपडे, सचिन सावंत यांनी सरबत याची सोय केली होती, सोलापूर शहराचा जवळ रॉयल सायकल सायकल क्लब यांनी यांनी पाणी व पोहे याची सोय केली होती. कोर्टी येथे रेवणसिद्ध मंदिरामध्ये महाप्रसाद चे आयोजन करण्यात आले होते तर विजापूर येथे अण्णा बिरादार यांचा हॉटेल मध्ये मुक्काम आणी जेवण ची उत्कृष्ट सोय करण्यात आली होती असे संस्थापक सदस्य गजानन खैरे यांनी सांगितले.

पुणे ते हंपी राईडमध्ये इंडो अथलेटिक्स सोसायटीचे गिरीराज उमरीकर, अजित गोरे ,संदीप परदेशी, रमेश माने, श्रीकांत चौधरी , सुशील मोरे, अमीत पवार , प्रतीक पवार, नितीन पवार, सुधाकर टिळेकर, अविनाश चौगुले , रवी पाटील , अमृता पाटील , पूनम रणदिवे , मंगेश दाभाडे , शिवाजीराव काळे , स्वप्नील लोढा, दर्शन वाले , हनुमंत शिंदे , गणपत मसाळ, अभिजित सरवदे , रमेश सेनचा ,प्रवीण पवार , धनाजी गोसावी , अभय खटावकर, दत्तात्रय मेंदुगडे, राहुल जाधव, मंगेश भुजबळ , सुजित मेनन, माधवन स्वामी, वाल्मिक अहिरराव , देविदास खुर्द , अमित कडे , शीतलकुमार चौहान , अनिल पिंपळकर , डॉ. अजित कुलकर्णी ,विवेक सिंग, चैतन्य वझरकर , अमित कुमार, सुबोध मेडीसीकर , प्रसाद सागरे, संदीप परदेशी, हेमंत दांगट, पंजाबराव इंगळे ,नरेश चड्ढा , अभिजित रोडे , तानाजी मांगडे, संतोष टोणपे, सचिन टोणपे, उमेश सुर्वे, श्रेयस पाटील, विवेक कडू , सुनिलजी चाको , प्रशांत जाधव , मदन शिंदे, अजित पुरोहित, ईश्वर जामगावकर , सागर शिरभाते, बालाजी जगताप, दीपक उमरणकर, दत्तात्रय आनंदकर , योगेश तावरे, योगेश कौशिक आदी सायकलस्वार सहभागी झाले होते. .

इंडो ऍथलेटिक सोसायटीने आजपर्यंत दहा वर्षांमध्ये शंभराहून अधिक सामाजिक उपक्रम यशस्वीपणे घेतले आहेत यामध्ये भक्ती शक्ती सायक्लोथोन , घोरवडेश्वर बाईक अँड हाईक, पुणे टू पंढरपूर सायकल वारी, पुणे टू शिवनेरी दुर्गवारी, नवरात्री रन, पुणे टू गेट ऑफ इंडिया अशा विविध राईड यशस्वीपणे घेण्यात आले आहे, संस्थेला विविध स्थानिक स्वराज्य संस्थेचे बरेचसे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. खेळातून समाज प्रबोधन घडवण्यात संस्था नेहमीच पुढे करणे असते. आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रामध्ये भारतामध्ये उल्लेखनीय कार्य करण्याuत इंडो ऍथलेटिक्स सोसायटी संस्था नेहमीच अग्रगण्य स्तरावर राहिली आहे.