चिंचवड,दि.१०(पीसीबी) – पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर काळी शाई फेकण्याचा प्रकार चिंचवडगाव येथे झाला. मोरया गोसावी समाधी महोत्सवाचे उद्टनासाठी पाटील हे चिंचवडगाव येथे आले असतानाच हा प्रकार घडला.
भाजपचे शहर सरचिटणीस मोरेश्वर शेडगे यांच्या निवासस्थानी ते चहासाठी थांबले होते. तेथून बाहेर पडतानाच अचानक एका कार्यकर्त्याने त्यांच्या समोर येऊन काळी शाई चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर फेकली. त्यात पाटील यांचा चेहरा तसेच सफेद शर्टवर डाग पडले. अचानाक घडलेल्या या प्रकारामुळे सगळेच गोंधळून गेले. शाई फेकणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.











































