दामदुपटीचे आमिष दाखवून मित्रानेच केली डॉक्टरची साडे पंधरा लाखांची फसवणूक

0
191

आकुर्डी, दि. १० (पीसीबी) – दुकानदार मित्राने डॉक्टरला गुंतवणूक करण्यास सांगून दामदुपटीचे आमिष दाखवून डॉक्टरकडून तब्बल 15 लाख 60 हजार रुपये उकळले. तेच पैसे परत मागितले असता मि६ने थेट जिवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार सप्टेंबर 2020 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत खेड मधील वराळे गावात घडला.

गणेश मुरलीधर सोनवणे (वय 38 रा. आकुर्डी) यांनी महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पप्पू रामदेवाशी (रा.वराळे, मुळ राजस्थान) यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे डॉक्टर असून त्यांच्या वराळे येथील दावाखान्या शेजारी आरोपीचे किराणा मालाचे दुकान आहे. रोजच्या बोलण्यातून दोघांची मैत्री झाली. आरोपी हा बाहेर गावचा असल्याने त्याला बँक कर्ज देत नाहीत शिवाय भिशीचे पैसेही त्याला मिळत नसल्याचे त्याने फिर्यादीला सांगितले. त्यामुळे त्याने फिर्यादीकडे पैशांची मागणी केली. सुरुवातीला फिर्यादींनी टाळाटाळ केली. नंतर आरोपीने फिर्यादींना म्हटले की तुम्ही फ्क्त गुंतवणूक करा, मी व्यापारी माणूस आहे तुमचा पैसा मी डबल करून देतो विश्वास ठेवा म्हणून फिर्यादीचा विश्वास संपादन केला पुढे 2020 ते 2021 या एक वर्षाच्या कालावधीत फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी 15 लाख 60 हजार रुपये घेतले. मात्र ते आजतागायत परत केले नाहीत. ते मागण्यासाठी गेले असता फिर्यादीला आरोपीने फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.