लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्‍वगायिका सुलोचना चव्हाण यांचे निधन.

0
305

पुणे, दि. १० (पीसीबी) – मराठी मनोरंजन विश्वासाठी अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. साठ वर्षांहून अधिक काळ आपल्या गायनाने रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्‍वगायिका सुलोचना चव्हाण यांचे आज शनिवारी 10 डिसेंबर रोजी निधन झाले आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सोळावं वरीस धोक्याचं.. उसाला लागलं कोल्हा.. आंबा आलाय पाडला, पावणा ;पुण्याचा आलाय गं.. अशा शेकडो लावण्या ज्यांनी अजरामर केल्या असा संगीत क्षेत्रातला बुलंद आवाज आज हरपला. काही महिन्यांपूर्वीच त्यांना भारत सरकारच्या ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यावेळीच त्यांची प्रकृती काहीशी ठीक नसल्याने त्यांना व्हील चेअर वरून आणण्यात आले होते.

काही महिन्यांपूर्वी त्या घरात पडल्या होत्या. त्यांच्या कमरेचं हाड मोडलं होतं. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. पण त्याला फारसा सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने त्या तेव्हापासून एकाच जागेवर होत्या. शिवाय वयामुळेही प्रकृती खालावली होती. गेल्या काही दिवसात त्यांची प्रकृती अहडीक चिंताजनक होती. त्यांच्या स्मृतीही कमजोर होत होत्या. त्यावर इलाज नसल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याने त्या घरीच होत्या. अखेरी शनिवारी गीरगाव येतील राहत्या घरीच त्यांचे निधन झाले. अशी माहिती त्यांचा मुलगा विजय चव्हाण यांनी  दिली.