पिंपरी दि.८, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज हिमाचल प्रदेश मधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या स्पष्ट विजयाबाबत आनंद उत्सव साजरा करत जल्लोष करण्यात आला.
पिंपरी चौकात काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून ढोल ताशे वाजवत, फटाक्यांची आतिषबाजी करत, मिठाई वाटत, काँग्रेस विजयाच्या घोषणा देत जल्लोष करण्यात आला.
सायंकाळी ६ वाजता काँग्रेस कार्यकर्ते पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भीमसृष्टी चौकात एकवटले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव व जल्लोषाल सुरुवात केली.
हिमाचल प्रदेश मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला 68 पैकी 40 जागांवर विजय मिळत स्पष्ट बहुमत दिल्याबद्दल शहर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हिमाचल प्रदेशच्या नागरिकांचे आभार व्यक्त करत आनंद साजरा केला.
याप्रसंगी हा विजय काँग्रेसच्या नेत्या सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी, प्रियांका जी गांधी व काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि हिमाचल प्रदेश मधील नागरिकांचा व काँग्रेस विचाराचा विजय असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितले. त्याचबरोबर हिमाचल प्रदेश मधील नागरिकांनी महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ, दडपशाही, पिळवणूक, अत्याचार, भ्रष्टाचार व एकाधिकारशाही या सर्वांविरुद्ध हा कौल दिल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितले.
याप्रसंगी शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, महिला काँग्रेसचे अध्यक्ष सायली ताई नढे, पिंपरी चिंचवड काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष वीरेंद्र गायकवाड, पिंपरी विधानसभा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विश्वनाथ जगताप, चिंचवड विधानसभा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माऊली मलशेट्टी,पिंपरी चिंचवड अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष विजय ओव्हाळ, स्वातीताई शिंदे छायावती देसले, आशाताई भोसले, हिराचंद जाधव, विजय इंगळे, अभिमन्यू दहीतुले अर्जुन लांडगे लक्ष्मण वावरे, जुबेर खान, मिलिंद फडतरे, पांडुरंग जगताप, सुधाकर कुंभार, उमेश बनसोडे, दीपक भंडारी, सचिन कदम आदी उपस्थित होते.