दिल्लीत महापालिका निवडणूक निकालांची रणधुमाळी…! पहा आत्तापर्यंत कोणाला किती जागा…

0
302

नवी दिल्ली,दि.०७(पीसीबी) – दिल्लीत महानगरपालिकेसाठी निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकीत आम आदमी पार्टी आणि भाजप यांच्यात अटीतटीची लढत सुरू आहे. 42 मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी सुरू आहे. एकूण 1,349 उमेदवारांच्या भवितव्याचा काही क्षणात फैसला होणार आहे. याआधी सर्व एक्झिट पोलच्या अंदाजात आपचे सरकार होणार असल्याचे दाखवण्यात आले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही जनतेचे अभिनंदन केले आहे. एमसीडीमध्ये गेल्या दीड दशकांपासून सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या भवितव्याचा फैसलाही काही वेळात होणार आहे.

या निकालाचे अपडेट्स समोर येत आहेत. आम आदमी पक्षाला बहुमत मिळत आहे. सर्व 250 जागांचे कल आणि निकाल जाहीर झाले आहेत. आप 129 जागांवर आघाडीवर आहे तर भाजप 106 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 10 आणि इतर 5 जागांवर आघाडीवर आहेत.

बहुमतासाठी किमान 126 जागा जिंकाव्या लागतील, MCD मध्ये एकूण 250 जागा आहेत. पूर्ण बहुमतासाठी कोणत्याही पक्षाला किमान 126 जागा जिंकाव्या लागतील. दिल्ली महानगरपालिका गेल्या 15 वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे. याअगोदर राजधानी महानगरपालिकेचे 3 भागात विभाजन करण्यात आले होते. एमसीडी निवडणुकीत एकूण 1349 उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे. त्यापैकी 382 उमेदवार अपक्ष आहेत. भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्षाने सर्व 250 जागांसाठी आपले उमेदवार उभे केले, तर काँग्रेसने केवळ 247 उमेदवार उभे केले.