उद्योगमंत्र्यानी थापा बंद करून राज्याची दिशाभूल थांबवावी – काशिनाथ नखाते

0
190

 मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने दोन लाख नोकऱ्या गमावल्या.

पिंपरी,दि.17 (पीसीबी) – महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ मोठे उद्योग आणून कामगारांना,तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्या साठी एकही प्रयत्न न करता केवळ उद्योगमंत्री केवळ घोषणाच करत आहेत.यापूर्वी त्यानी टाटा एअरबस चा प्रकल्प महाराष्ट्रात आणू असे आश्वासन दिले मात्र तो गुजरातला गेला, वेदांता- फोक्सकॉन, टाटा एअर बस, बल्क ड्रग पार्क ,मेडिकल डिव्हाईस पार्क अशा अनेक कंपन्या गुजरात व इतर राज्यात गेल्या ते उघड्या डोळ्याने पहात राहिले , त्या थांबवण्यात अपयश आलेल्या राज्य सरकारने नवीन कोणताही उद्योग आणलेला नाही.

येत्या काही दिवसात ३०ते ४० हजार कोटीची गुंतवणूक महाराष्ट्रात होईल अशी घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय व्यापारी मेळाव्यात बोलताना केली मात्र अशा थापा मारायचे बंद करावे व राज्यातील कंपन्या बाहेर गेल्यामुळे उपेक्षित, दुःखी झालेल्या तरुणांच्या जखमेवर मीठ चोळू नये. महाराष्ट्रातील उद्योग खोके सरकार आल्यावर गुजरातमध्ये का जात आहेत,याचे उत्तर उद्योग मंत्र्यांनी दिले असते तर बरे झाले असते अशी टीका कष्टकरी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले

उद्योग मंत्री हे प्रत्यक्षात कुठलेही काम न करता एखाद्या प्रकल्प न आणता तीन महिन्यापासून केवळ घोषणा करत आहेत, याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे निषेध करत काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की राज्य शासन विविध धोरण आखत असल्याची माहिती देणे अनेक वेळा प्रसारमाध्यमासमोर व्यक्त केलेले आहे मात्र प्रत्यक्षात असं कुठलेही होत नाही तोपर्यंत बघता बघता १लाख ८० हजार कोटी गुंतवणुकीला महाराष्ट्र मुकला आहे . उद्योगमंत्री केवळ इलेक्ट्रिक वाहन धोरण ,कृषी उद्योग धोरण , पोलाद धोरण, चमडे धोरण आखण्यात येणार असल्याची घोषणाही ते अनेकदा करत आहेत. मात्र प्रत्यक्षात कुठलाही प्रकल्प हातात येत नाही. यापूर्वीच्या सुरू असलेल्या उद्योगांना वीज, पाणी सध्या मिळत नाही, लाईट नसल्यामुळे अनेकांचे उत्पादन ठप्प झालेले आहे. नव्या उद्योगाबरोबरच जुने प्रकल्प ,कंपन्या हि राज्याबाहेर जाण्याचे स्थिती ओढावली आहे. उद्योग मंत्र्यांनी अशा प्रकारच्या थापा मारणे बंद करून मंत्री या नात्याने खऱ्या अर्थाने एखादा प्रकल्प आणून महाराष्ट्र राज्यांमध्ये सुरू करून इथल्या तरुणांना रोजगार देण्याची संधी त्यांच्याकडे आहे ते पूर्ण करावे अन्यथा केवळ अशा थापा व आश्वासनेच ठरणार आहेत.