नवी दिल्ली,दि.१४(पीसीबी) – राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव गेल्या काही वर्षांपासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यामुळे आता लालू प्रसाद यादव यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांची मुलगी रोहिणी आचार्य आपली एक किडनी वडिलांना दान करणार आहे. लालू प्रसाद यादव यांच्या मुलीने गुरुवारीच आपल्या वडिलांसाठी मी किडनी दान करणार असल्याचे जाहीर केले होते. आपली एक किडनी वडिलांना देणार असल्याचे तिने ट्विट करुन माहितीही दिली होती.
लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी यांनी ट्विट करुन एक किडनी वडिलांना देणार असल्याचे सांगत त्यांनी आपला आणि वडिलांचा एक जुना फोटोही शेअर केला होता.
माँ- पिता मेरे लिए भगवान हैं. मैं उनके लिए कुछ भी कर सकती हूँ. आप सबों के शुभकामनाओं ने मुझे और मजबूत बनाया है.
मैं आप सबके प्रति दिल से आभार प्रकट करती हूँ. आप सब का विशेष प्यार और सम्मान मिल रहा है.
मैं भावुक हो गयी हूँ. आप सबको दिल से आभार कहना चाहती हूँ. pic.twitter.com/ipvrXrFitS
— Rohini Acharya (@RohiniAcharya2) November 11, 2022
त्या फोटोमध्ये ती खूप लहान असल्याचे दिसत आहे. रोहिणी आचार्य यांनी ट्विटवर लिहिले आहे की, मला वाटतं की, माझ्या शरीरातील एक मासाचा तुकडा आहे, जो मी माझ्या बापाला देऊ इच्छिते. मी वडिलांसाठी काही करु शकते. त्यामुळे तुम्हीही प्रार्थना करा की सगळं काही व्यवस्थित होईल, आणि माझे वडिल पुन्हा येतील आणि येथील माणसांसाठी ते पुन्हा आवाज उठवतील. पुन्हा एक तुमच्या शुभेच्छांसाठी माझ्याकडून शुभेच्छा असंही त्यांनी सांगितले. तर दुसऱ्या एका पोस्टमध्ये रोहिणी यांनी लिहिले आहे की, या जगात मला हाक मारणारे, मला मायेने हाक मारणारे, बोलवणारे माझे वडिल माझ्यासाठी सगळं काही आहेत. त्यामुळे माझ्या आयुष्यातील एक छोटासा भाग देऊन त्यांच्या आयुष्याला थोडं फार काही देऊ शकले तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. आई आणि वडिल या जगात देवासारखे आहेत, आणि त्यांची सेवा करण्यासाठी सगळ्या आपल्या कर्तव्याचे पालन केले पाहिजे असंही तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.
त्यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढेही लिहिले आहे की, माझे आई वडिल माझ्यासाठी देवासारखे आहेत. त्यामुळे मी त्यांच्यासाठी काहीही करायला तयार आहे. तुमच्या सदिच्छांमुळे मला धीर आला आहे.
त्यामुळे मी सगळ्यांची आभारी आहे. या गोष्टीमुळे मला तुमचं सगळ्याचं प्रेम आणि माया मिळत आहे. आणि आता या क्षणी खूप भावूक झाले आहे. तुमच्या या सगळ्यांच्या सदिच्छा आणि शुभेच्छांमुळे मी तुमची आभारही व्यक्त करते असंही त्यांनी म्हटले आहे.