वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नां बाबतीत लवकरच मंत्रीपातळीवर चर्चा – देवेंद्र फडणवीस

0
161

मुंबई,दि.०५(पीसीबी) – महाराष्ट्रातील वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांचे अनेक महत्वपूर्ण विषयांवर मागील सरकारने पुर्णपणे निक्रीयता दाखविल्यामुळेच कामगारांचे प्रश्न प्रलंबितच राहीले आहेत , त्यामुळे प्रलंबित प्रश्नांबाबतीत महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघा सोबत लवकरच सविस्तर बैठक आयोजित करून निश्चीतच कामगारांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन मा.ना. देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री व उर्जा मंत्री यांनी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) च्या शिष्टमंडळ ला मंगळवार दि 1 नोव्हेंबर रोजी मंत्रालय मुंबई येथे झालेल्या बैठकीत दिले आहे.

या शिष्टमंडळात कोथरुड विधानसभा माजी आमदार व राष्ट्रीय महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा मा.प्रा.डॉ.सौ:मेधाताई कुलकर्णी, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे ज्येष्ठ मार्गदर्शक मा.अण्णाजी देसाई, संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे महामंत्री अरूण पिवळ, उपमहामंत्री प्रशांत भांबुर्डेकर इत्यादी उपस्थित होते.

संघटनेच्या वतीने कामगारांचे महत्वपूर्ण मागण्या बाबतीत सविस्तर निवेदन ऊर्जामंत्री यांना दिले आहे. इतर राज्या प्रमाणे महाराष्ट्रातील कंत्राटी कामगारांना कायम करावे याची सुरुवात वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या पासून करावी असे निवेदनात नमूद आहे. या साठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन मा.प्रा.डॉ.सौ:मेधाताई कुलकर्णी यांनी संघटनेला दिले आहे.