गोवा आणि उत्तर प्रदेशच्या यशानंतर ठाकरे गट गुजरात निवडणूक लढवणार का?

0
196

मुंबई दि,४ (पीसीबी) -मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. गुजरात निवडणुकीवरून त्यांनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून वाटचाल करणारा ठाकरे गट गुजरात विधानसभेची निवडणूक लढवणार का? असा खोचक सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे. नुकतीच उत्तर प्रदेश आणि गोवा विधानसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत मिळालेल्या भव्य यशानंतर ठाकरे गट गुजरात निवडणूक लढवणार की माघार घेणार असा साधा प्रश्न पडल्याचं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाला जोरदार टोला लगावला आहे. गुजरात निवडणुकीवरून देशपांडे यांनी ठाकरे गटावर निशाण साधला आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून वाटचाल करणारा ठाकरे गट गुजरात विधानसभेची निवडणूक लढवणार का? असा खोचक टोला संदीप देशपांडे यांनी लगावला आहे. राऊत साहेब म्हणायचे आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत. त्यामुळे आता आम्ही भारतभर निवडणुका लढवणार आहोत. म्हणून मला एक साहाजिकच प्रश्न पडला, गोव्याच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत त्यांना जे भव्य यश मिळालं, त्यानंतर ते गुजरात निवडणूक लढवणार का असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वीच पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने काँग्रेसला जोरदार धक्का देत मोठं यश मिळवलं होतं. या यशानंतर आता आपने गुजरात विधानसभा निवडणुकीवर आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे. तर दुसरीकडे गुजरात विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडू जोरदार प्रयत्न सुरू आहेत.