किशोरी पेडणेकरांची पोलिसांकडून चौकशी, किरीट सोमय्यांचा नवा डाव

0
218

मुंबई ,दि.२९ (पीसीबी)- मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप साफ फेटाळून लावले. शिवाय दादर पोलीस स्थानकात चौकशीला मी जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. हे दबावतंत्र असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. कसंही करुन मला अडकवण्याचा हा प्रयत्न असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी यावेळी म्हटलंय.

एसआरए गाळ्यांवर किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. त्यांची कालही चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलणवण्यात आलं होतं. दरम्यान, ज्या एसआरए गाळ्यावरुन त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते, तिथे त्या आज सकाळी दाखल झाले होते.
दरम्यान, यावेळी गाळेधारकांसोबत यावेळी किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांसमोर बातचीत केली आहे. दरवेळी प्रत्येक गोष्टीला आरोपीच्या पिंजऱ्या उभं केलं जातं, असा आरोपही त्यांनी यावेळी केली.

गोमाता नगरमध्ये मी 2017 साली अर्ज भरला होता, असं त्या म्हणाल्या. कारण नसताना आता या सगळ्याप्रकरणी पुन्हा राळ उठवली जाते आहेत. गामातामध्ये काही दुकानं आणि बालवाड्या सोसायटीच्या ताब्यात आहेत. इथला एक जरी गाळेधारक बोलला की गाळे किशोरी पेडणेकर यांचे आहेत, तर कुलूप लावा, असं थेट आव्हानही त्यांनी केलं.एका सामान्य महिलेला त्रास दिला जात असल्याचा आरोप पेडणेकर यांनी सोमय्यांवर केला. न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे, असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय. किशोरी पेडणेकर यांच्यावर सनसनाटी आरोप किरीट सोमय्यांनी खळबळ उडवून दिली होती. त्याला किशोरी पेडणेकर यांनी थेट प्रत्युत्तर दिलं आहे. जाणीवपूर्ण टार्गेट केलं जात असल्याचं टोला त्यांनी यावेळी लगावलाय.