आदित्य ठाकरेंनी घेतली दिवंगत माजी आमदार निम्हण यांच्या कुटुंबियांची भेट

0
215

पुणे  ,दि.२८(पीसीबी) – पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे दिवंगत माजी आमदार विनायक निम्हण यांच काल निधन झालं. त्याच दरम्यान पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे आले असता त्यांनी विनायक निम्हण यांच्या कुटुंबियांची घरी जाऊन त्यांनी भेट घेतली आणि विचारपूस देखील केली. तसेच यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या उपसभापती नीलम गोऱ्हे या देखील उपस्थित होत्या.

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, ज्येष्ठ शिवसैनिक, जुना सहकारी आणि एक चांगला माणूस आम्ही काल गमावला. तसेच आमचे त्यांच्या परिवारासोबत नेहमी चांगले संबंध राहिले असून आम्ही कायम त्यांच्या कुटुंबीयांसोबत असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.