डॉ. बाबासाहेब आंबेकर यांचा फोटो नोटांवर असला पाहिजे – कॉँग्रेस

0
403

नवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी) : आम आदमी पार्टीचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी नुकतीच चलनी नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीच्या फोटोची मागणी केली होती. त्यानंतर यावरुन देशभरात उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या. यानंतर नोटांवर शिवाजी महाराजांची प्रतिमा असावी अशी मागणीही झाली. त्यानंतर आता डॉ. आंबेडकरांचा फोटो नोटांवर असणं जास्त लवचिक राहिलं, असं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यानं म्हटलं आहे.

काँग्रेसचे खासदार मनिष तिवारी यांनी म्हटलं, भारतीय चलन हे देशाच्या सार्वभौमत्वाचं प्रतिक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या सार्वभौमत्वाला घटनात्मक रुप दिलं आहे, त्यामुळं नोटांवर डॉ. आंबेडकरांचा फोटो असणं हे अधिक लवचिक अर्थात सर्वमान्य राहिलं. त्याचबरोबर गणपती, लक्ष्मी, पौराणिक चिन्हं तसेच वर्तमानातील काही चिन्हंही सामावून घेण्याची लवचिकता चलनी नोटांमध्ये आहे, असंही त्यांनी म्हटलं.

गणपती आणि लक्ष्मी यांचं भारतीय संस्कृतीत विशेष स्थान आहे. कोणतंही महत्वाचं काम सुरु करताना आपण या देवतांची प्रार्थना करतो. त्यामुळं मी केजरीवालांच्या विधानाच्या विरोधात नाही. त्यामुळं ते त्यांच्या जागी योग्य आहेत, असंही काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी म्हटलंय.