राष्ट्रवादीला आणखी दहा ते 15 वर्षे सत्तेसाठी तळमळत बसावं लागेल

0
326

सातारा, दि. २७ (पीसीबी) : सत्तांतरानंतर राज्यातलं समीकरण पूर्णपणे बदललं आहे. आता शिवसेनेनंतर राष्ट्रवादीनं शिंदे गटाला घेरायला सुरुवात केलीय. मात्र, शिंदे गटातील शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादीला थेट इशारा दिला आहे. हजारोंच्या मतांनी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला तुम्ही निवडून येणार नाही, असं सांगणाऱ्या मेहबूब शेख यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्तेपद सोडून कुंडलीवरून भविष्य बघायचा नवीन व्यवसाय सुरू केला आहे का? असा सवाल देसाईंनी केलाय. राष्ट्रवादीनं कितीही ताकत लावली तरी येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत दूध का दूध और पानी का पानी होईल, असं प्रतिउत्तर राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शेख यांना दिलंय.

राष्ट्रवादीला आणखी दहा ते 15 वर्षे सत्तेसाठी तळमळत बसावं लागेल, या मंत्री देसाईंच्या टीकेवर दत्तानाना भरणे व राष्ट्रवादीचे प्रवक्ते मेहबूब शेख यांनी मंत्री देसाईंवर टीका करताना ते पाटण मतदारसंघातून आगामी निवडणुकीत निवडून येणार नसल्याची भाकित केलं होतं. त्याला मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांच्याच शैलीत उत्तर दिलं आहे. दत्तानाना भरणे यांनी पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा असेल असे म्हणाले आहेत. कोणालाही आपला पक्ष वाढवायचा असतो. त्यानुसार प्रत्येक नेते आपल्या पक्षाला राज्यात एक नंबर आणायचा प्रयत्न करतो. दत्ता नानांनी संसदीय आयुधांचा योग्य वापर करून बोलले आहेत. पण, मेहबूब शेख यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते पद सोडून भविष्य व कुंडली बघायचा व्यवसाय सुरू केलाय काय का? असा सवाल देसाईंनी केलाय.