सैन्यदलातील अधिकारी व कर्मचारी यांचेसमवेत दिवाळी फराळ

0
274

निगडी दि.२३ (पीसीबी) – “सैन्यदलातील विविध विभागातील अधिकारी, सैनिक अहोरात्र नेमणूकीच्या ठिकाणी कार्यरत असतात, त्यांच्यामुळे संपूर्ण देशभरातील नागरिक उत्साहात, आनंदात व सुरक्षितपणे सणवार, उत्सव व समारंभ आपापल्या कुटुंबासोबत साजरे करु शकतात. अशा या कर्तव्य बजावत असणाऱ्या सैनिकांसमवेत अलिकडच्या काळात फक्त दिवाळीच नव्हे तर अन्य सणही देशभक्त नागरिक साजरे करीत आहेत ही अतिशय आनंदादायी बदल आहे. फक्त सिमेवरच नव्हे तर आपल्या शहराच्या आसपासही विविध ठिकाणी सैनिक कार्यरत आहेत, त्यांच्या आनंदात समाजाने जरुर सहभागी व्हावे.” असे आवाहन डॉ. रमेश बन्सल यांच्या केले.

निमित्त होते देहुरोड येथील फिल्ड अम्युनिशन डेपोमधील सैनिकांसमवेत दिवाळी फराळ. यावेळी श्रीकांत मापारी, विनोद बन्सल, डॉ. शैलजा भावसार आदि मान्यवर उपस्थित होते.”खाना बचाओ-खाना खिलाओ, संस्था” व “युनायटेड भावसार ऑर्गनायझेशन” यांच्या व अन्य राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या सहभागातून या डेपोमधील पाचशे सैनिकांना दिवाळी फराळ व शुभेच्छा देण्यात आल्या.

प्रशासन अधिकारी कर्नल प्रियांक चौधरी यांनी उपस्थितांचे स्वागत करुन उपक्रम सुरु केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. यावेळी मनोज भावसार, श्वेता पेंढारकर यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रामशरण गुप्ता, संतोष झेंडे, रमेश बनगोंडे, पुष्पा गुप्ता, उषा बन्सल, प्रफुल्ल अहिर, विजय सातपुते यांनी विशेष सहकार्य केले.
भास्कर रिकामे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन व सुत्रसंचालन केले.