रामनगर,काळभोरनगर परिसरातील रस्ते दुरुस्त करून डांबरीकरण करा – विशाल काळभोर

0
309

चिंचवड, दि. २२ (पीसीबी) – यंदा ऑक्टोबर महिना संपत आला तरी जोरदार पाऊस सुरू आहे. मात्र, पावसामुळे काळभोर नगर, रामनगर, दत्तनगर, विद्यानगर MIDC या भागातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. त्यामुळे पादचारी नागरिकांना, दुचाकीस्वारांना या रस्त्यावरून जाताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पाऊस थांबताच या भागातील तत्काळ रस्ते दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर यांनी केली आहे.

याबाबत विशाल काळभोर यांनी अ क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य विभागांच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, रामनगर, येथील सर्व अंतर्गत रस्ते, विद्यानगर व दत्तनगर,विधानगर येथील खदाणीतील मुख्य रस्ता, समता मित्र मंडळ चौक ते पंतप्रधान आवास योजना, मोहननगर पर्यंत रस्ता,
काळभोरनगर येथील MIDC रोडची खोदकामामुळे दुरावस्था झाली आहे. या सर्व भागातील रस्ते महापालिकेने पाऊस थांबताच तत्काळ दुरूस्त करावेत. तसेच डांबरीकरण करावे, अशी मागणी विशाल काळभोर यांनी केली आहे.

याबाबत विशाल काळभोर म्हणाले, महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या दुरदृष्टीने शहराच्या विविध भागात प्रशस्त रस्ते निर्माण केले आहेत. मात्र, सध्या शहरातील प्रमुख रस्त्यांसह काळभोर नगर, रामनगर, दत्तनगर या भागातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे.

त्यामुळे पाऊस थांबताच महापालिकेने युद्ध पातळीवर रस्ते दुरुस्तीची विशेष मोहीम राबवावी, अशी मागणीही विशाल काळभोर यांनी केली आहे.