चिखली, दि. २१ (पीसीबी) – ब्रँडेड कंपनीचे लॅपटॉप कमी किमतीत देण्याची जाहिरात देऊन पैसे घेऊन लॅपटॉप न देता तरुणाची फसवणूक केली. ही घटना 16 जुलै 2021 ते 19 ऑक्टोबर 2022 या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून घडली.
प्रशांत प्रदीप धुमाळ (वय 30, रा. चिखली रोड, चिंचवड) यांनी याप्रकरणी अनोळखी व्यक्तीच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने क्विकर वेबसाईटवर ब्रँडेड कंपनीचे लॅपटॉप स्वस्तात देण्याची जाहिरात दिली. फिर्यादीस वेळोवेळी व्हाट्सअप कॉल व मेसेज करून वेळोवेळी पैशांची मागणी केली. फिर्यादींनी पैसे पाठविले असता त्यांना लॅपटॉप न पाठवता तसेच लॉयड सायबर सपोर्ट 88 या वेबसाईटवरून फसवणूक झालेली रक्कम परत मिळवून देण्याचे आमिष दाखवून वेगवेगळे चार्जेस सांगून एक लाख 18 हजारांची फसवणूक केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.