मेदनकरवाडी मधून इको गाडी चोरीला

0
233

चाकण, दि. २० (पीसीबी) – सोसायटी समोर पार्क केलेली इको गाडी चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 17) मध्यरात्री मेदनकरवाडी येथे घडली.

संदीप अशोक दरेकर (वय 43, रा. बोरजाईनगर, मेदनकरवाडी, ता.खेड ) यांनी चाकांना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची दीड लाख रुपये किमतीची इको गाडी त्यांच्या सोसायटीच्या समोर पार्क केली होती. सोमवारी मध्यरात्री बारा ते दोन वाजताच्या सुमारास चोरटयांनी फिर्यादीची इको गाडी चोरून नेली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.